हॉकी इंडियाकडून इंग्लंडला चोख प्रत्युत्तर, भारतीय पुरुष आणि महिला संघाची Commonwealth Games मधून माघार ; काय आहे कारण?

कॉमनवेल्थ गेम्स  28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान इंग्लंडच्या बर्मिंघम येथे होणार आहे. 10 सप्टेंबरपासून या 32 दिवसानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा चीनच्या हांग्झोऊ येथे होणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना लिहिलेल्या पत्रात क्रीडा संस्थेने आयोजकांना त्यांच्या निर्णयाबद्दल आगाऊ माहिती देण्याची विनंती केली आहे.

    पुढील वर्षी होणाऱ्या Commonwealth Games 2022 मध्ये भारतीय हॉकी संघ सहभागी होणार नाहीत. भारताने हा निर्णय कोविड -19 आणि यूकेमध्ये 10 दिवसांच्या विलगीकरणात ठेवण्याशी संबंधित चिंतांमुळे घेतला आहे. इंग्लंडला युरोपमधील सर्वात जास्त प्रभावित देश असल्याचे सांगत हॉकी इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांची प्राथमिकता आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारत या स्पर्धेच्या माध्यमातून आपली तयारी मजबूत करेल.