भारतीय खेळाडू सर्वाधिक सहनशील;  सौरव गांगुली म्हणतो… 

परदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू हे परदेशी खेळाडूंपेक्षा मानसिकरित्या अधिक सक्षम आणि सहनशील असतात. मी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा अनेक परदेशी खेळाडूंसोबत खेळलो आहेत. ते मानसिकरित्या लवकर पराभव स्वीकारतात. पण गेल्या सहा-सात महिन्यांपासून बायो-बबलमध्ये क्रिकेट होत आहे आणि नक्कीच ही खूप कठीण गोष्ट आहे. हॉटेलची खोली आणि स्टेडियम या व्यतिरिक्त कुठेही जाता येत नाही. खेळातल्या दबावाला सामोरे जाणं आणि त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये एका खोलीत येणे नंतर पुन्हा मैदानात जाणे हे एक वेगळेच जग आहे.

  कोलाकता : कोरोना विषाणूची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक बदलही करावे लागले आहेत. सर्वात कठीण नियम म्हणजे ‘बायो बबल’ते निर्बंध. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आता ‘बायो बबल’च्या नियमांनुसारच सहभागी व्हावे लागते. याबाबत अनेक खेळाडूंनीही तक्रारी केल्या असतानाच भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने मात्र या नियमावरून भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

  भारतीय खेळाडू प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज असतात, असे तो म्हणाला. सौरवने एका ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी बायो बबलच्या मुद्यावर त्याने आपले मत प्रदर्शित केले.

  ‘ते’ एक वेगळेच जग

  परदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू हे परदेशी खेळाडूंपेक्षा मानसिकरित्या अधिक सक्षम आणि सहनशील असतात. मी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा अनेक परदेशी खेळाडूंसोबत खेळलो आहेत. ते मानसिकरित्या लवकर पराभव स्वीकारतात. पण गेल्या सहा-सात महिन्यांपासून बायो-बबलमध्ये क्रिकेट होत आहे आणि नक्कीच ही खूप कठीण गोष्ट आहे. हॉटेलची खोली आणि स्टेडियम या व्यतिरिक्त कुठेही जाता येत नाही. खेळातल्या दबावाला सामोरे जाणं आणि त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये एका खोलीत येणे नंतर पुन्हा मैदानात जाणे हे एक वेगळेच जग आहे.

  दरम्यान, कोरोना काही सहजपणे जाणाऱ्यातला नसून त्याचा धोका पुढेही राहील असेही सौरव म्हणाला. त्यामुळे खेळाडूंना सकारात्मक राहावं लागेल. तुम्हाला स्वत:ला मानसिकरित्या तयारी करावी लागेल आणि आपल्याला खेळाडूंना मानसिकरित्या प्रशिक्षित करावे लागेल असा सल्लाही त्याने खेळाडूंना दिला.

  नव्या नियमामुळे अनेक हालचालींवर निर्बंध

  कोरोना काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून सर्व खेळाडूंना आता ‘बायो बबल’मध्ये राहावे लागते. यात खेळाडूंना त्यांच्या हॉटेलमध्ये राहावे लागते. त्यांच्या प्रवासावर आणि हालचालींवर निर्बंध येतात. त्यांना कुणाला भेटताही येत नाही. स्टेडियम आणि हॉटेल असा इतकाच प्रवास करण्याची मुभा खेळाडूंना असते. यामुळे खेळाडूंना एकटे पडल्याचा अनुभव येत असून मानसिकरित्या खचून जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.