भारताचे नेमबाज टोकियोत दाखल; क्वारंटाईन होण्याची गरज नाही

    टोकियो : जगभरातील खेळाडू आता टोकियोत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भारताचे नेमबाजही शनिवारी पहाटे टोकियोत दाखल झाले. त्यांना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये (क्रीडानगरी) आपापली खोली देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे त्यांना क्वारंटाईन होण्याची गरज नाही.

    १९ जुलैपासून (सोमवार) ते सरावाला सुरुवात करणार आहेत. ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा या टोकियोच्या उत्तर पश्चिम भागात असलेल्या सैतामा येथील असाका शूटिंग रेंजवर होणार आहेत.

    याच ठिकाणी १९६४ ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा झाल्या होत्या. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. ते सोमवारपासून या स्पर्धेच्या तयारीला पुन्हा सुरुवात करतील, असे सांगण्यात आले.