माजी क्रिकेटरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने करावा लागतोय संघर्ष ; मदतीसाठी भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विन पुढे सरसावला

भारतने म्हटलं होतं की, पॅट्रिक पैटरसन यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यांच्याकडे किराणा माल खरेदी करण्यासाठी आणि जेवणाची व्यवस्था करणंही जड जात आहे. कृपया पैटरसन यांची मदत करावी.

    नवी दिल्ली –  क्रिकेटपटू किंवा माजी क्रिकेटर्स यांचे आयुष्य भारतात जसं श्रीमंतात आहे तसं प्रत्येक देशात नाही. अनेक देशातील माजी क्रिकेटर्सची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याने जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येते.असाच एक आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या मोठ्या नावापैकी एक समोर आला आहे.

    वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज पॅट्रीक पैटरसन यांचे सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.पैटरसन यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता त्यांच्या मदतीसाठी भारताचा गोलंदाज आर अश्विन पुढ सरसावला आहे. आर अश्विनने ट्विटरवर पोस्ट करून या दिग्गज खेळाडूसाठी मदतीचं आवाहन केले आहे.

    यात म्हटलंय की, पॅट्रिक पैटरसन यांना त्याच्या जीवनात मदतीची गरज आहे. भारतीय चलनात मदत करण्याचा पर्याय नाही परंतु जर कोणी मदत करू शकत असेल तर कृपया पैटरसन यांना मदत करा असं आवाहन आर. अश्विनने ट्विटरमध्ये केले आहे. पैटरसन यांच्यावर पहिलं ट्विट भारत सुंदरसन यांनी केले होते.

    भारतने म्हटलं होतं की, पॅट्रिक पैटरसन यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यांच्याकडे किराणा माल खरेदी करण्यासाठी आणि जेवणाची व्यवस्था करणंही जड जात आहे. कृपया पैटरसन यांची मदत करावी.