इंग्लड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण

कोरोनाग्रस्त भारतीय क्रिकेटपटूला घशात खवखव होऊ लागल्याने त्याने कोरोनाची चाचणी करुन घेतली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्याने स्वत:ला विलगीकरण कक्षात ठेवले आहे. मात्र त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत.

    भारतीय क्रिकेट संघाच्या सराव सामन्याच्या काही दिवस आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मोठा झटका बसला आहे. इंग्लंडमधील भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या खेळाडूला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

    न्यूझीलंड विरूद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना बायो बबलमधून बाहेर पडून काही वेळ घालवण्याची परवानगी देण्यात आली होती. २३ जून रोजी चॅम्पियनशिपची फायनल झाली. बीसीसीआयनेही परवानगी देताना खेळाडू आणि इतर कर्मचारी जुलैच्या मध्यात पुन्हा बायो बबलमध्ये परततली असल्याचं स्पष्ट केलं होतं. टीम इंडिया इंग्लंडविरोधात ५ मॅचेसची टेस्ट सिरीज खेळणार असून ४ ऑगस्टपासून दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्त भारतीय क्रिकेटपटूला घशात खवखव होऊ लागल्याने त्याने कोरोनाची चाचणी करुन घेतली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्याने स्वत:ला विलगीकरण कक्षात ठेवले आहे. मात्र त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. याबरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सहकारी आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही ३ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांनी आपला विलगीकरण कालावधी पूर्णही केला आहे.

    दरम्यान, अद्याप या सदस्याचं नाव मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही.