हार्दिक पांड्यासह भारतीय क्रिकेटपटूंचा भन्नाट डान्स, VIDEO तुफान व्हायरल

तमिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या प्रसिद्ध ‘वाथी कमिंग’ गाण्यावर या भारतीय क्रिकेटपटूंनी ठेका धरला. भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनसह अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू कुलदीप यादव हेदेखील विजयच्या ‘वाथी कमिंग’ स्टेपची नक्कल करताना दिसत आहेत.

  भारताचा क्रिकेटपटू आणि फलंदाज हार्दिक पांड्यासह फिरकीपटू आर. अश्विन आणि कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंनी भन्नाट डान्स केला आहे. तमिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या प्रसिद्ध ‘वाथी कमिंग’ गाण्यावर या भारतीय क्रिकेटपटूंनी ठेका धरला. भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनसह अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू कुलदीप यादव हेदेखील विजयच्या ‘वाथी कमिंग’ स्टेपची नक्कल करताना दिसत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ashwin (@rashwin99)

  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करताना अनेकदा दिसला आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्यांच्या गाण्यावर त्याने डान्स केला होता. त्यानंतर आता भारतीय संघातील खेळाडू साऊथस्टार विजयच्या गाण्यावर थिरकताना दिसले.