भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानच्या खेळाडूला धक्का

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.

    भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.

    सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.