भारतामधील टी-२० वर्ल्ड कपचा पाकला होतोय त्रास, ना खेळाडूंसाठी वीजाची गॅरंटी, ना भारत सरकारची मान्यता

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी सांगितलं की, खेळाडूंसाठी भारतात वीजा मिळणार की नाही, यावर आमचा भारत सरकारवर विश्वास नाहीये. आयसीसीला सांगितलं की, जर भारताने वीजाबाबत लिहून आश्वासन दिलं नाही तर, टूर्नामेंट दुसऱ्या देशात शिफ्ट करायला पाहिजे.

    यंदाच्या वर्षात टी-२० वर्ल्ड कपचा सामना भारतात खेळवला जाणार आहे. हा सामना ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी सांगितलं की, खेळाडूंसाठी भारतात वीजा मिळणार की नाही, यावर आमचा भारत सरकारवर विश्वास नाहीये. आयसीसीला सांगितलं की, जर भारताने वीजाबाबत लिहून आश्वासन दिलं नाही तर, टूर्नामेंट दुसऱ्या देशात शिफ्ट करायला पाहिजे.

    आयसीसी सुद्दा टूर्नामेंटच्या स्थिती वर लक्ष ठेवणार आहे. जर भारत सरकार हे टूर्नामेंट देशात खेळवण्यासाठी सक्षम नसेल, तर आयसीसी टी-२० वर्ल्ड कप दुसऱ्या देशात खेळवणे योग्य राहीलं. त्यामुळे UAE ला पर्याय म्हणून ठेवण्यात आला आहे.

    भारत-पाकिस्तान संबंध

    यंदाचा टी-२० वर्ल्ड कप सामना ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही जबाबदारी भारताला देण्यात आली आहे. आता २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध चांगले नसल्यामुळे आयसीसी दोन्ही देशांच्या बोर्डाशी विचारविनिमय करत चर्चा करणार आहे. जर भारताला हे मान्य नसेल. तर टूर्नामेंट दुसऱ्या देशात शिफ्ट केली जाणार आहे.