Tokyo Olympics 2020 | टोक्यो ऑलम्पिकसाठी भारताचे शिलेदार १७ जुलैला रवाना होणार , क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा; #cheer4india या नावाचे अभियान देखील सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
क्रीडा
Published: Jul 13, 2021 07:14 PM

Tokyo Olympics 2020टोक्यो ऑलम्पिकसाठी भारताचे शिलेदार १७ जुलैला रवाना होणार , क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा; #cheer4india या नावाचे अभियान देखील सुरु

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
टोक्यो ऑलम्पिकसाठी भारताचे शिलेदार १७ जुलैला रवाना होणार , क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा; #cheer4india या नावाचे अभियान देखील सुरु

टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण १८ प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभाग घेणार आहेत. भारतीय खेळाडूंची एकूण संख्या १२६ आहे. ही आतापर्यंत भारताकडून ऑलम्पिकमध्ये पाठवण्यात आलेली सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी (#cheer4india ) नावाचे अभियान सुरु केले आहे.

  नवी दिल्ली : टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेला (Tokyo Olympics 2020) आता काही दिवसच राहीले आहेत. या स्पर्धेसाठी भारताचे शिलेदार १७ जुलैला रवाना होणार आहेत. तसेच भारतीय आघाडीच्या क्रिकेटपटूंनी (Team India Wish To All Players) संपूर्ण भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी (#cheer4india ) नावाचे अभियान सुरु केले आहे. आता पीएम मोदी या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजता खेळाडूंना संबोधित करणार आहेत.

  या संबोधना दरम्यान मोदीजी खेळाडूंशी संवादही साधणार आहेत. तसेच खेळाडूंच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दलही मोदीजी जाणून घेणार आहेत. याबाबत नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

  १८ प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभाग घेणार

  टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण १८ प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभाग घेणार आहेत. भारतीय खेळाडूंची एकूण संख्या १२६ आहे. ही आतापर्यंत भारताकडून ऑलम्पिकमध्ये पाठवण्यात आलेली सर्वाधिक संख्या आहे.

  भारताला ऑलम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळण्याची शक्यता निशानेबाजी, तिरंदाजी आणि कुस्ती या खेळात आहे. भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी टोक्यो ऑलम्पिकपूर्वीच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आल्याने देशाला तिच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत.

  उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातून ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या १० खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी  पुरस्कारांची घोषणा केली आहे. युपींमधून शूटर सौरभ चौधरीही सामिल आहे. सरकारने घोषणा केलेल्या पुरस्कांरानुसार सहभागी सर्व खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील. तर सिंगल इवेंटमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ६ कोटी रूपये देण्यात येणार आहेत.

  तुम्हाला या बातमी बाबत काय वाटते? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २० सोमवार
  सोमवार, सप्टेंबर २०, २०२१

  पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.