भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘अजिंक्य’ विजय, कोहलीने केलं खास ट्विट…

विराट कोहलीनेही (Virat Kohli Tweet ) भारतीय संघाचं अभिनंदन करत अजिंक्यचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघं ७० धावांचं लक्ष दिलं होतं. भारताने हे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करुन ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला.

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) पार पडलेल्या या कसोटी मॅचमध्ये चारही दिवस भारताने गाजवले. चार दिवसातल्या एकाही सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाला (India Vs Australia) उजवी कामगिरी करु दिली नाही. विशेष म्हणजे नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत मराठामोळ्या अजिंक्यच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाने नमवलं आहे. साहजिकच अजिंक्य रहाणेवर दिग्गज खेळाडू कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

विराट कोहलीनेही (Virat Kohli Tweet ) भारतीय संघाचं अभिनंदन करत अजिंक्यचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघं ७० धावांचं लक्ष दिलं होतं. भारताने हे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करुन ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला. यानंतर विराटने ट्विट करत म्हटलंय की, भारतीय टीमने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि विजय मिळवला. भारतीय खेळाडू आणि खासकरून अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल मला विशेष आनंद आहे. यानंतर भारतीय संघाची कामगिरी अधिक सरस असेल.