टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, रहाणेचं टेन्शन वाढलं ; कोण आहे ‘तो’ नववा खेळाडू?

मयंकला हनुमा विहारी (Hanuma Vihari) च्याऐवजी टीममध्ये खेळवण्यात येणार होतं, पण आता सराव करत असताना त्यालाही दुखापत झाली आहे. मयंकच्या दुखापतीचं स्कॅनिंग करण्यात आलं आहे, याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्याला फ्रॅक्चर होऊ नये, या आशेवर टीम प्रशासन आहे. पण या दुखापतीमुळे ब्रिस्बेन टेस्टमध्ये कोण खेळणार, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटीचे सामने सुरू असून टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या नऊ खेळाडूंना दुखापत झाली आहे. तर यातले सहा खेळाडू दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. तसेच तीन खेळाडू दौऱ्यावर येण्याआधीच दुखापतग्रस्त झाले आहेत.  त्यातच आता सराव सुरू असताना मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यालाही दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयंकला हनुमा विहारी (Hanuma Vihari) च्याऐवजी टीममध्ये खेळवण्यात येणार होतं, पण आता सराव करत असताना त्यालाही दुखापत झाली आहे. मयंकच्या दुखापतीचं स्कॅनिंग करण्यात आलं आहे, याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्याला फ्रॅक्चर होऊ नये, या आशेवर टीम प्रशासन आहे. पण या दुखापतीमुळे ब्रिस्बेन टेस्टमध्ये कोण खेळणार, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मोहम्मद शमी, उमेश यादव, रविंद्र जडेजा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी आधीच बाहेर झाले आहेत. तर ऋषभ पंत, मयंक अगरवाल आणि आर.अश्विन या तिघांना दुखापत झाली असली, तरी ते अजूनही सीरिजमध्ये आहेत.