आयपीएल २०२० च्या सामन्यांचे वेळापत्रक रविवारी जाहीर होणार

आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक उद्या रविवारी जाहीर (schedule will be announced on Sunday)  करण्यात येणार आहे, अशी माहिती गवर्निंग काउंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल (IPL chairman Brijesh Patel) यांनी दिली.

युएईमध्ये आयपीएल २०२० (IPL 2020) चे सामने खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांची तारीख जवळ आल्याने क्रिकेट रसिकांची सामान्यांबाबतची उत्कंठा वाढली आहे. आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक उद्या रविवारी जाहीर (schedule will be announced on Sunday)  करण्यात येणार आहे, अशी माहिती गवर्निंग काउंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल (IPL chairman Brijesh Patel) यांनी दिली.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी शुक्रवारी आयपीएल क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे क्रिकेट रसिक वेळापत्रकाची वाट बघत होते. मात्र, चेन्नई सुपरकिंग्ज संघातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वेळापत्रकात बदल करावे लागले आहेत. त्यामुळे आता सामन्यांचे वेळापत्रक रविवारी जाहीर होणार आहे. तसेच या वेळापत्रकासाठी आणखी एक दिवस क्रिकेट प्रेमींना वाट बघावी लागणार आहे.

दरम्यान, आयपीएलचा तेरावा मोसम १९ सप्टेंबरपासून १० नोव्हेंबरदरम्यान खेळवण्यात येणार आहे. याची घोषणा होताच सर्व संघ संयुक्त अरब अमीरातला पोहोचले आहेत.