आयपीएलचं पुढे काय होणार ? सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उर्वरित मॅचेस खेळवल्या जाण्याची शक्यता

IPL मॅनेजमेंट आणि सर्व फ्रेंचाइजी यांच्यात सद्यस्थिती आणि भविष्यकालीन उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत चर्चा झाली. पंजाबकडून लीग खेळण्यासाठी प्लेअर्स अनुकूल असल्याचे सांगण्यात आले. तर दिल्ली कॅपिटलच्या फ्रेंचाईसमध्ये याबाबत दोन मते होती. यावेळी पहिल्यांदाच दिल्लीच्या टीमला चॅम्पियन होण्याची संधी होती, त्यामुळे खेळ सुरु राहावा, असे एक मत होते.

  मुंबई : IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा हा हंगाम कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे रद्द करावा लागला. सोमवारी आणि मंगळवारी , दोन दिवसांत ४ प्लेअर्स, एक कोच आणि २ सहाय्यक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने, उर्वरित ३१ मॅचेस तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बीसीसीआय BCCI सप्टेंबरमध्ये परिस्थितीचा अंदाज घेऊन उर्वरित IPLच्या मॅचेस तेव्हा खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

  आयपीएल स्थगितीचा निर्णय कसा झाला

  IPL मॅनेजमेंट आणि सर्व फ्रेंचाइजी यांच्यात सद्यस्थिती आणि भविष्यकालीन उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत चर्चा झाली. पंजाबकडून लीग खेळण्यासाठी प्लेअर्स अनुकूल असल्याचे सांगण्यात आले. तर दिल्ली कॅपिटलच्या फ्रेंचाईसमध्ये याबाबत दोन मते होती. यावेळी पहिल्यांदाच दिल्लीच्या टीमला चॅम्पियन होण्याची संधी होती, त्यामुळे खेळ सुरु राहावा, असे एक मत होते.

  तर दुसरीकडे फ्रेंचाईजीचे अध्यक्ष पार्थ जिंदाल सद्यस्थिती पाहता मॅचेस खेळवू नयेत , या मताचे होते. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सचे आकाश आंबानी हेही लीग स्थगित करण्याच्या बाजूने होते. याचप्रमाणे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्येही दुमत होते. अखेरीस जोखीम न स्वीकारता लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  परदेशी प्लेअर्स थांबण्यास होते अनुत्सुक

  लीगमध्ये सहभागी असलेले परदेशी प्लेअर्स सध्याच्या कोरोनाच्या स्थितीत देशात थआंबू इच्छित नव्हते, हेही एतक महत्त्वाचे कारण होते. सगळ्यात टीममधअये असलेल्या परदेशी प्लेअर्सनी लीग थांबवण्याची मागणी केली होती.

  आता उर्वरित IPL सप्टेंबरमध्ये खेळवण्याचे आव्हान

  आता यापुढे IPLच्या उर्वरित मॅचेस खेळवण्यासाठी बीसीसीआयला २० ते २५ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. येत्या काळात टीम इंडिया आणि उर्वरित टीमच्या बिझी शेड्यूलमधून इतके सलग दिवस मिळणे, हे मोठे आव्हान ठरणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडच्या क्वारंटाईन नियमांनुसार दोन आठवड्यांपूर्वी टीमला इंग्लंडमध्ये पोहचावे लागले. यानंतर टीम इंग्लंडमधअयेच राहणार असून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये टेस्ट सीरिज खेळूनच परतणार आहे. ही टेस्ट सीरिज ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

  या सीरिजनंतरच सप्टेंबरच्या शेवटच्या पंधरा दिवसांत आयपीएलच्या उर्वरित मॅचेस होण्याची शक्यता आहे. कारण त्यानंतर ऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप सुरु होणार आहे. वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरु झाल्यास मार्चपर्यंत प्लेअर्सना वेळ मिळणे अवघड आहे. या वर्ल्ड कपनंतर वर्षअखेरीस टीम इंडिया द. अफ्रिकेच्या दैऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर जानेवारी ते मार्चच्या दरम्यान वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत टेस्ट सीरिज होणार आहे. त्यानंतर २०२२ च्या एप्रिलमध्ये पुन्हा IPLचा नवा सिझन सुरु होणार आहे. थोडक्यात सप्टेंबरनंतर IPLच्या उर्वरित मॅचेस करायच्या असतील तर एखादी आंतरराष्ट्रीय सीरीज रद्द करावी लागणार आहे.

  IPLशी संबंधितांच्या सुरक्षेबाबत तडजोड नको होती-जय शाहा

  BCCIची IPLशी संबंधित व्यक्तींच्या आरोग्याबाबत तडजोड करण्याची इच्छा नव्हती, म्हणूनच स्थगितीचा निर्णय घेण्यात आला, असे बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी यांगितले आहे.