आयपीएल 2021; लुईस, थॉमस राजस्थान रॉयल्सच्या संघात

राजस्थान रॉयल्सने वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हीन लुईस आणि जलदगती गोलंदाज ओशाने थॉमस यांना करारबद्ध केले आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विंडीज फलंदाजांमध्ये लुईस पाचव्या क्रमांकावर आहे. लुईसने 103 षटकारांसह 1318 धावा केल्या आहेत. षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेल (121) हा एकमेव फलंदाज लुईसच्या पुढे आहे.

    मुंबई : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघांनी आपापल्या बदली खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. राजस्थान रॉयल्सनेही(Rajasthan Royals) जोस बटलर व बेन स्टोक्स यांच्याजागी बदली खेळाडूंची नावे जाहीर केली. इंग्लंडचे खेळाडू जोस बटलर व बेन स्टोक्स हे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीत.

    राजस्थान रॉयल्सने वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हीन लुईस आणि जलदगती गोलंदाज ओशाने थॉमस यांना करारबद्ध केले आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विंडीज फलंदाजांमध्ये लुईस पाचव्या क्रमांकावर आहे. लुईसने 103 षटकारांसह 1318 धावा केल्या आहेत. षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेल (121) हा एकमेव फलंदाज लुईसच्या पुढे आहे.

    लुईस सध्या कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाचे प्रतिनिधित्व करताना 6, 62 आणि 30 अशा धावा केल्या आहेत. रॉयल्सकडून प्रथमच तो खेळणार आहे. याआधी आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून 2018 व 2019 मध्ये खेळला आहे. ओशाने थॉमस पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात परतला आहे.

    2019 च्या पर्वात तो राजस्थानकडून चार सामने खेळला होता व 5 विकेट्स घेतल्या होत्या. सीपीएलमधील बार्बाडोस रॉयल्स संघातील थॉमस हा दुसरा खेळाडू आहे जो राजस्थानकडून खेळणार आहे. यापूर्वी जोफ्रा आर्चर याला रिप्लेसमेंट म्हणून न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याला राजस्थानने करारबद्ध केले होते.