IPL 2021 मध्ये आज होणार मुंबई आणि राजस्थानचा महामुकाबला, प्ले ऑफमध्ये जाण्याची सुवर्णसंधी

या हंगामामध्ये मुंबई आणि राजस्थान यांच्यात पहिला सामना २९ एप्रिल रोजी खेळवण्यात आला होता. त्यामध्ये मुंबईने ७ गडी राखून राजस्थानवर मात मिळवली होती.परंतु या हंगामामध्ये आतापर्यंत चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू या संघांनी प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय केली आहे.

    IPL-2021च्या दुसऱ्या सत्रात Mumbai Indians आणि Rajasthan Royals यांच्यात आज महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांना १२ सामन्यांमधून १०-१० पॉइंटस मिळाले आहेत. दोघांनाही प्ले ऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी आणि सामना जिंकण्यासाठी मोठ्या संख्येने रनरेटची आवश्यकता आहे.

    या हंगामामध्ये मुंबई आणि राजस्थान यांच्यात पहिला सामना २९ एप्रिल रोजी खेळवण्यात आला होता. त्यामध्ये मुंबईने ७ गडी राखून राजस्थानवर मात मिळवली होती.परंतु या हंगामामध्ये आतापर्यंत चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू या संघांनी प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय केली आहे.

    परंतु चौथ्या स्थानासाठी कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये रनधुमाळी सुरू आहे. यामध्ये कोलकाताचा रनरेट (+0.294) इतका असून हा संघ चांगल्या स्थितीत खेळत आहे. तर राजस्थान (-0.337) आणि मुंबई (-0.453) ला जिंकण्यासोबतच रनरेट अधिक वाढणे आवश्यक आहे.

    मुंबईच्या टीमने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली नाहीये. त्यामुळे संघाला ५ मधून ४ सामने गमवावे लागले आहेत. तर राजस्थानला ५ सामन्यांमधून २ सामने जिंकता आले आहेत. तर ३ सामन्यात त्यांचा मोठा पराभव झाला आहे.