IPL 2021 Qualifier 2 : आज केकेआर विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सचं महायुद्ध, विजेता संघ चेन्नईशी भिडणार

दिल्लीचा संघ मागील हंगामात अंतिम सामन्यात उतरला होता. तर कोलकाताने (KKR In Second Session) दुसऱ्या सत्रात चांगलं प्रदर्शन केलं आहे. या सामन्यानंतर कोणता संघ चेन्नईशी महामुकाबला करणार हे पाहणं आता क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

  IPL 2021च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज (बुधवार) केकेआर विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (KKR Vs DC ) यांच्यात महायुद्ध पाहायला मिळणार आहे. विजेता संघ अंतिम सामन्यात चेन्नईशी(CSK) भिडणार आहे. दिल्लीचा संघ मागील हंगामात अंतिम सामन्यात उतरला होता. तर कोलकाताने (KKR In Second Session) दुसऱ्या सत्रात चांगलं प्रदर्शन केलं आहे. या सामन्यानंतर कोणता संघ चेन्नईशी महामुकाबला करणार हे पाहणं आता क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

  ८ मधून ६ सामन्यांत KKR चा विजय

  कोलकाता (KKR) संघ दुसऱ्या सत्रात उत्तम कामगिरी करत आहे. केकेआरने ८ मधून ६ सामन्यांवर विजय मिळवला आहे. २८ सप्टेंबरला दिल्लीसोबत झालेल्या सामन्यात केकेआरने तीन गडी राखत गड राखला होता.

  दिल्लीला अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी

  दिल्लीच्या संघाने या हंगामात उत्कृष्ट आणि बहारदार प्रदर्शन केलं आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीचा संघ क्वालिफायर २ मध्ये पोेहोचला आहे. पॉइंट्स टेबलवर दिल्ली पहिल्या क्रमांकावर होती. परंतु दिल्लीने अंतिम सामन्यात एक संधी गमावली आहे. क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई विरूद्धच्या सामन्यात दिल्लीला पहिला मोठा धक्का बसला होता. त्यामध्ये त्यांचा ४ विकेट्सने पराभव झाला होता. या सामन्यामध्ये कॅप्टनकूल धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये हॅट्ट्रीक चौके मारत दिल्लीचं मन तोडून टाकलं होतं.

  दरम्यान, दिल्लीला क्वालिफायर -२ मध्ये सामना जिंकण्याची संधी असून अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आज सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच केकेआरचा संघ सुद्धा दिल्लीला हरवण्यास सज्ज झाला असून हा सामना कोणता संघ जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.