आयपीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे खेळाडूंना पत्र, म्हणाले…

लीग संपल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविणे ही बीसीसीआयची जबाबदारी आहे, असे आश्वासन आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) हेमंग अमीन (IPL COO letter to IPL players)यांनी दिले आहे.

    भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (corona second wave)आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळणारे बरेच खेळाडू खूप चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत ते आपल्या देशात कसे परततील याची त्यांना चिंता आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू ही स्पर्धा सोडण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, लीग संपल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविणे ही बीसीसीआयची जबाबदारी आहे, असे आश्वासन आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) हेमंग अमीन(IPL COO letter to IPL players) यांनी दिले आहे. खेळाडूंनी काळजी करू नये, असे त्यांनी सांगितले.

    अमीन यांनी सर्व परदेशी खेळाडू, सहाय्यक कर्मचार्‍यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये सीओओने खेळाडूंच्या भीती आणि चिंता यावर भाष्य केले आहे. या पत्राद्वारे खेळाडूंना आश्वासन देण्यात आले आहे, की बीसीसीआयची ही स्पर्धा खेळाडू सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचल्याशिवाय संपणार नाहीत.

    या पत्रामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “आम्हाला माहित आहे, की आपणापैकी बरेच जण स्पर्धा संपल्यानंतर आपल्या घरी कसे पोहोचेल याबद्दल घाबरून गेले आहात, जे नैसर्गिक आणि समजण्यासारखे आहे. आम्ही आपल्याला खात्री देतो, की या संदर्भात आपण कशाचीही काळजी करू नये. आपण सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचू शकता आणि याची काळजी बीसीसीआय घेईल”.

    बीसीसीआयने सर्व परदेशी खेळाडूंना आश्वासन दिले, की बीसीसीआय देशातील करोनामुळे परिणाम झालेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत खेळाडू सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचत नाही, तोपर्यंत ही स्पर्धा आमच्यासाठी संपणार नाही, अशी ग्वाही मंडळाने खेळाडूंना दिली आहे.