१९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये आयपीएल ?

१९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये आयपीएल सुरू होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. तर ८ नोव्हेंबरपर्यंत आयपीएलची फायनल होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये आयपीएल खेळवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आयपीएल २०२० (IPL 2020) च्या तेराव्या हंगामाची वाट पाहणाऱ्या क्रिकेट प्रेमींसाठी ही एका आनंददायक बातमी आहे.

तसेच आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामुळे या बैठकीत आयपीएलबाब अंतिम रूपरेषा काय असणार आहे. या सर्व गोष्टी ठरवण्यात येणार आहेत.  आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामांचे हे आयोजन ५१ दिवसांचं असेल. अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव यंदा क्रिकेट विश्वावर पडला असून, क्रिकेट अनेक सामने रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा मोठा फटका क्रिकेट विश्वाला बसला आहे. तसेच यावर्षी आयसीसीने ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.