यूएईमध्ये रंगणार आयपीएल, सामन्यांच्या वेळेत बदल…

रविवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली,  या बैठकीमध्ये आयपीएलची स्पर्धा यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. तसेच आयपीएलचे अंतिम वेळापत्रक ठरले आहे. यामध्ये सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहेत. तसेच ज्या दिवशी डबल हेडर सामने असतील त्या दिवशी दुपारचा सामना हा साडेतीन वाजता सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय महिलांचा आयपीएलही खेळला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

 भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमध्ये समालोचनाचं काम करणारा आकाश चोप्रा याने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तसेच आयपीएलची फायनल १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. सध्याच्या हंगामासाठी व्हिवो हीच कंपनी स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.