जाडेजाच्या अंगठ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी; सामन्यात लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करताना रवींद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही त्याने फलंदाजी सुरु ठेवली, मात्र दुसऱ्या डावात तो गोलंदाजी करू शकला नाही. तसेच १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यालाही तो मुकणार आहे.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून जाडेजा पुन्हा एकदा धमाकेदार पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर भारतातल्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टी-२०, एक दिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकांपूर्वी जाडेजा पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी आशा आहे.

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करताना रवींद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही त्याने फलंदाजी सुरु ठेवली, मात्र दुसऱ्या डावात तो गोलंदाजी करू शकला नाही. तसेच १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यालाही तो मुकणार आहे.

शस्त्रक्रियेनंतर जाडेजाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याचा हात खांद्याला बांधलेला दिसत असून अंगठ्यावर प्लास्टर लावल्याचे दिसतेय. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मात्र काही काळ ‘ऑऊट ऑफ अॅक्शन’ राहील. परंतु लवकरच धमाकेदार पुनरागमन करेन, असे कॅप्शन जाडेजाने या फोटोसोबत दिले आहे.