२०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून जपानची माघार

फिफाकडून येत्या गुरूवारी फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाची घोषणा करण्यात येणार आहे. परंतु या २०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून एका देशाने माघार घेण्याचे वृत्त समोर आले आहे. महिला विश्वचषक

फिफाकडून येत्या गुरूवारी फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाची घोषणा करण्यात येणार आहे. परंतु या २०२३ च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून एका देशाने माघार घेण्याचे वृत्त समोर आले आहे. महिला विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदातून जपानने माघार घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांना यजमानपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे.

जपान फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कोझो ताशिमा यांनी सांगितले की, जपानला महिलांच्या विश्वचषक फुटबॉलच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे नाइलाजास्तव जाहीर करावे लागत आहे. परंतु या मागील कारण नेमकं काय आहे ? ते अद्यापही समोर आलेलं नाही आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला सर्वाधिक पसंती आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून मिळाली होती. त्यामुळे हे दोन संघ भक्कम दावेदार असल्याचं समजलं जात आहे.