Japan's Naomi Osaka withdraws from French Open after winning two championships; 10 lakh fine

जगातील दुसर्‍या क्रमांकाची महिला टेनिसपटू असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले, त्यामुळे तिला 15 हजार डॉलर्स अर्थात 10 लाख भारतीय रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर आता नाओमीने त्याच घटनेनंतर मानसिक आरोग्याचा मुद्दा पुढे करत स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, नाओमी ओसाका जगातील अव्वल टेनिसपटूंमध्ये येते. नुकतेच तिने अमेरिकन ओपन 2020 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या दोन्ही स्पर्धेत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले होते.

  पॅरिस : जगातील दुसर्‍या क्रमांकाची महिला टेनिसपटू असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले, त्यामुळे तिला 15 हजार डॉलर्स अर्थात 10 लाख भारतीय रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर आता नाओमीने त्याच घटनेनंतर मानसिक आरोग्याचा मुद्दा पुढे करत स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, नाओमी ओसाका जगातील अव्वल टेनिसपटूंमध्ये येते. नुकतेच तिने अमेरिकन ओपन 2020 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या दोन्ही स्पर्धेत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले होते.

  ट्विट करुन दिली माहिती

  स्पर्धेतून माघार घेत नाओमीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. यात तिने म्हटले आहे की, मी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलणार नसल्याचे सांगितले होत तेव्हा अशी परिस्थिती येईल असे मला वाटले नव्हते. स्पर्धा सुरुळीत चालावी आणि इतर खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी स्पर्धेतून माघार घेत आहे. मी जास्त बोलकी नसल्याने प्रसारमाध्यमांशी बोलल्याने मला मानसिक ताण येतो. ज्याचा परिणाम माझ्या खेळावर होतो. म्हणूनच मी माध्यमांशी बोलणे टाळत होते. पण माझा संदेश योग्यरित्या पोहोचला नाही. त्यामुळे अशी परिस्थिती आली. माझ्यासाठी मानसिक आरोग्यही तितकच महत्त्वाचे असल्याने मी माघार घेत आहे लवकरच परत भेटू. नाओमीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने पॅरिसमधील पत्रकारांची माफीही मागितली आहे.

  फ्रेंच टेनिस फेडरेशनने मागितली माफी

  फ्रेंच टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष गिलेस मोरेटन यांनी नाओमीच्या स्पर्धेतून माघार घेण्यावर प्रतिक्रिया दिली. नाओमीच्या या निर्णयाचा आम्हाला त्रास झाला असून आम्ही याबद्दल माफी मागतो असे मोरेटन यांनी म्हटले आहे.

  दिग्गजांनी दर्शविला पाठिंबा

  नाओमी ओसाकाच्या माघार घेण्याच्या निर्णयाला अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिला आहे. टेनिसपटू मार्टिना नवरतिलोवाने ट्विट केले की, मी ओसाकासाठी दुःखी आहे. मला आशा आहे की ती ठीक आहे. अॅथलीट म्हणून आपल्याला स्वतःच्या शरीराची मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या काळजी घ्यावी लागते.

  सर्व एकसारखे नसतात

  अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्सनेही नाओमीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ती म्हणाली, मला ओसाकाबद्दल वाईट वाटते आणि मला तीला मिठी मारायची आहे, कारण ते कसे आहे हे मला माहिती आहे. ती म्हणाली, आम्ही भिन्न व्यक्तिमत्त्वे आहोत आणि लोक वेगळे असतात, सर्व एकसारखे नसतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी हाताळतो. ओसाकाला तिच्या इच्छेनुसार गोष्टी हाताळायला दिल्या पाहिजेत.