SRH आणि PBKS ला मोठा धक्का, आयपीएल 2021च्या स्पर्धेतून दोन दिग्गज खेळाडूंची माघार

इंग्लंडचे दोन दिग्गज खेळाडू जॉनी बेयरस्टो आणि डेविड मलान या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या फेजमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. बेयरस्टो हैदराबादचा खेळाडू असून तो उत्तम फलंदाज आहे. तर मलानने आयपीएल 2021च्या सुरूवातीला फक्त पहिलाच सामना खेळला होता. तसेच आयपीएल 2021 चा पहिला फेज भारतात खेळवण्यात आला होता. 

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका पूर्ण झाल्यानंतर आयपीएलच्या 2021 च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच आयपीएल 2021 च्या स्पर्धेतून दोन दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे SRH आणि PBKS ला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. आयपीएल 2021 च्या पुढील सामन्यांना येत्या 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तसेच हा सामना यूएईमध्ये खेळवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    इंग्लंडचे दोन दिग्गज खेळाडू जॉनी बेयरस्टो आणि डेविड मलान या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या फेजमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. बेयरस्टो हैदराबादचा खेळाडू असून तो उत्तम फलंदाज आहे. तर मलानने आयपीएल 2021च्या सुरूवातीला फक्त पहिलाच सामना खेळला होता. तसेच आयपीएल 2021 चा पहिला फेज भारतात खेळवण्यात आला होता.

    काही कारणास्तव दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या फेजमधून माघार घेतली आहे. भारताचे फिजिओ योगेश परमार पाचवी कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर भारतीय संघाने मॅनचेस्टर कसोटी खेळण्यास नकार दिला होता.