युव्हेंटसचा लीस संघावर ४-० असा दणदणीत विजय

रोम : युव्हेंटस नवव्यांदा सेरी-ए फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोना पेनल्टीवर साकारलेला एक गोल आणि दोन गोल करण्यात यश आल्यामुळे, युव्हेंटसने १० जणांसह

रोम : युव्हेंटस नवव्यांदा सेरी-ए फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोना पेनल्टीवर साकारलेला एक गोल आणि दोन गोल करण्यात यश आल्यामुळे, युव्हेंटसने १० जणांसह खेळणाऱ्या लीस संघावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. युव्हेंटसने दुसऱ्या क्रमांकावरील लॅझियोला सात गुणांनी मागे टाकत ६९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. 

पहिल्या सत्रात एकाही संघाला गोल करण्यात अपयश आल्यानंतर पावलो डायबला याने रोनाल्डोने दिलेल्या पासवर ५३व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलले. आठ मिनिटांनंतर मिळालेल्या पेनल्टीवर रोनाल्डोने चेंडूला गोल करण्यात यश आले. त्यामुळे ८३ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत त्याने युव्हेंटसला मोठी आघाडी मिळवून दिली.