पंजाबला मोठा धक्का, केएल राहुल रुग्णालयात दाखल ; नक्की काय आहे यामागील कारण?

रात्री केएल राहुलच्या पोटात दुखत होतं, यानंतर त्याला औषधं देण्यात आली, यानंतरही त्याला बरं वाटत नसल्यामुळे राहुलला इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं, तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आला. या टेस्टमध्ये त्याला तीव्र ॲपेंडिक्स (appendicitis) झाल्याचं समोर आलं.

    अहमदाबाद : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्सना (Punjab Kings) आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रात्री केएल राहुलच्या पोटात दुखत होतं, यानंतर त्याला औषधं देण्यात आली, यानंतरही त्याला बरं वाटत नसल्यामुळे राहुलला इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं, तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आला. या टेस्टमध्ये त्याला तीव्र ॲपेंडिक्स (appendicitis) झाल्याचं समोर आलं.यावर उपचारासाठी केएल राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंजाब किंग्सने केएल राहुल याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.