suryakumar

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पाक क्रिकेट बोर्डाला फटकारलं आहे. पाकचा युवा क्रिकेटपटू वयाच्या २४ व्या वर्षी सामी अस्लमने निवृत्ती घेत अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ साली  शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या सामी अस्लमने पाकिस्तानकडून १३ कसोटी आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. पाक क्रिकेट बोर्ड देशातल्या युवा खेळाडूंकडे योग्य लक्ष देत नसल्याचा आरोप कनेरियाने केला.

सूर्यकुमार यादवची(suryakumar yadav) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी(Australia) भारताच्या वन-डे आणि टी-२० संघामध्ये निवड झाली नाही. चांगली खेळी करुनही सूर्यकुमारच्या पदरी निराशा पडल्यामुळे त्याचे चाहते नाराज होते. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने चक्क सूर्यकुमारला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिली. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याविषयावर भाष्य केले आहे. सूर्यकुमार हा चांगला खेळाडू आहे . मात्र भारतीय संघात येण्यासाठी त्याला थोडी वाट बघावी लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

यावर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पाक क्रिकेट बोर्डाला फटकारलं आहे. पाकचा युवा क्रिकेटपटू वयाच्या २४ व्या वर्षी सामी अस्लमने निवृत्ती घेत अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ साली  शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या सामी अस्लमने पाकिस्तानकडून १३ कसोटी आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. पाक क्रिकेट बोर्ड देशातल्या युवा खेळाडूंकडे योग्य लक्ष देत नसल्याचा आरोप कनेरियाने केला.

कनेरियाने असे म्हटले आहे की, समी अस्लम सातत्याने चांगला खेळ करत होता, पण त्याच्यावर अन्याय झाला. शान मसूद, इमाम उल-हक यांच्याप्रमाणे सामी अस्लमला कधीही संधी मिळाली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अशा वागणुकीमुळे खेळाडूंना देश सोडून इतर देशाकडून खेळावं वाटणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर होती. परंतू त्याचा संघ, बीसीसीआय त्याच्यापाठीमागे ठाम उभा होता. त्यामुळे त्याला भारत सोडावा लागणार नाही.