फक्त चार ओव्हर टाकून कसे काय थकतात ? कपिल देव यांनी भारतीय गोलंदाजांच्या फिटनेसबाबत व्यक्त केली नाराजी

अलिकडे भारतीय संघातून चांगले वेगवान गोलंदाजही खेळू लागल्याने संघाच्या खेळात आणखी सुधारणा झाला आहे. मात्र या वेगवान गोलंदाजांच्या एका गोष्टीवर कपिल देव (Kapil Dev Angry About Indian Bowlers Fitness) नाराज आहेत. 

  मुंबई : भारतीय क्रिकेट संघात(Indian Cricket Team) एकापेक्षा एक चांगले क्रिकेटपटू आहे. फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही भारताकडे बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळापासून भारताकडे अव्वल दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाजीत अव्वल दर्जाचे फिरकीपटू होते. मात्र अलिकडे भारतीय संघातून चांगले वेगवान गोलंदाजही खेळू लागल्याने संघाच्या खेळात आणखी सुधारणा झाला आहे. मात्र या वेगवान गोलंदाजांच्या एका गोष्टीवर कपिल देव (Kapil Dev Angry About Indian Bowlers Fitness) नाराज आहेत.

  कपिल देव यांच्या मते भारताचे वेगवान गोलंदाज गोलंदाजी चांगले करत असले तरी ते लवकर थकतात त्यामुळे त्यांना अधिक काळ गोलंदाजी करता येत नाही. ज्यामुळे विकेट्स घेण्यातही त्यांना अडचण येते.

  कपिल यांनी त्यांच्या वेळेचे उदाहरण देताना सांगितले, त्यांच्या वेळेस वेगवान गोलंदाजाना गोलंदाजीसह फलंदाजीचाही भार उचलायला लागत होता, मात्र आता भारताकडे तगडी फलंदाजी असल्याने गोलंदाजाना फक्त गोलंदाजी करायची असल्याने त्यांनी न थकता गोलंदाजी करणे आवश्यक आहे.

  भारताकडून सर्वाधिक टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज म्हणजे कपिल देव. मात्र सध्याचे वेगवान गोलंदाज केवळ चार ओव्हर टाकल्यानंतर थकत असल्याचे पाहून कपिल देव यांना दुःख होते.

  ते म्हणतात, “कधी कधी हे पाहून दुःख होते की सध्याचे वेगवान गोलंदाज चार ओव्हर केल्यानंतर थकतात. मी तर असेही ऐकले आहे की, त्यांना चार ओव्हरहून अधिक गोलंदाजी करण्याची परवानगी देखील दिलेली नाही.”