केकेआरचा कर्णधार ईऑन मॉर्गनला दंड ; आयपीएलच्या नियमांचं केलं उल्लंघन

चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ३ गडी गमवत २२० धावा केल्या होत्या. मात्र कोलकात्याचा संघ १९.१ षटकात सर्वबाद २०२ धावा करु शकला. चेन्नईने कोलकात्याला १८ धावांनी पराभूत केलं. कोलकात्याचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. फाफ डु फ्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत कोलकात्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

    केकेआरचा कर्णधार ईऑन मॉर्गनला दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मात्र हा निर्णय कोलकात्याला चांगलाच महाग पडला.

    चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ३ गडी गमवत २२० धावा केल्या होत्या. मात्र कोलकात्याचा संघ १९.१ षटकात सर्वबाद २०२ धावा करु शकला. चेन्नईने कोलकात्याला १८ धावांनी पराभूत केलं. कोलकात्याचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. फाफ डु फ्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत कोलकात्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

    प्रत्युत्तरात कोलकाताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये आपले अर्धे फलंदाज गमावले, त्यानंतर आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्सने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. कोलकाताचा डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे.