सुपर संडेच्या दुसऱ्या सामन्यात KKR vs SRH आमनेसामने येणार, प्ले ऑफसाठी कोलकाता संघर्ष करणार

आजच्या सामन्यातील पराभवनंतर केकेआरच्या प्लेऑफसाठी पात्र होण्याची सर्व शक्यता संपुष्टात येतील. त्याचबरोबर आधीच प्लेऑफमधून बाहेर गेलेला हैदराबाद संघ आता केकेआरचा खेळ खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुबईमध्ये संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल. 

    IPL 2021 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) सुपर संडेच्या दुसऱ्या सामन्यात आमनेसामने येतील. केकेआरसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण प्ले ऑफ रेसमध्ये टिकून राहायचं असेल तर कोलकाताला हा सामना जिंकावाच लागणार आहे.

    आजच्या सामन्यातील पराभवनंतर केकेआरच्या प्लेऑफसाठी पात्र होण्याची सर्व शक्यता संपुष्टात येतील. त्याचबरोबर आधीच प्लेऑफमधून बाहेर गेलेला हैदराबाद संघ आता केकेआरचा खेळ खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुबईमध्ये संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल.

    कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हेड टू हेडमध्ये इयोन मॉर्गनच्या संघाचा दबदबा आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 20 सामने खेळले गेले आहेत.