टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडमध्ये आज दुसरा टी-२० सामना, वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी कोहलीला मोठी संधी

दुसऱ्या सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मॅचला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यामुळे इंग्लंड मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

    अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यात आज (रविवार) दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मॅचला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यामुळे इंग्लंड मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

    दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवणार आहेत. हार्दिक पांड्या देखील चौथ्या जागेवर असेल. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला ३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी मोठी संधी आहे. विराट कोहली ३ हजार धावांपासून ७२ धावांनी मागे आहे. जर या धावा पूर्ण झाल्या तर वर्ल्ड रेकॉर्ड करणार हा पहिला खेळाडू ठरणार आहे. विराटने ८६ सामन्यांमधून २ हजार ९२८ धावा पूर्ण केल्या आहेत. तर न्यूझीलंडच्या सामन्यात २८३९ धावा करत दुसऱ्या क्रमांक पटकावला होता.

    दुसऱ्या सामन्यात स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के चाहत्यांना मैदानात उपस्थित राहता येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता ही एकूण १ लाख ३२ इतकी आहे. त्यानुसार एकूण ६६ हजार चाहत्यांना उपस्थितीत राहता येणार आहे.