कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज आमनेसामने, केकेआर समोर 128 धावांचे लक्ष्य

दिल्लीने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता, तर चेन्नई सुपर किंग्जच्या हातून केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल फेज -2 मध्ये दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सामन्याला सुरुवात झाली. दिल्लीने प्रथम खेळताना 127/9 धावा केल्या.

    आयपीएल २०२१च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) आज आमनेसामने आले आहेत. दिल्ली दहा सामन्यांत आठ विजयांसह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर केकेआर सहा पराभव आणि चार विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

    दिल्लीने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता, तर चेन्नई सुपर किंग्जच्या हातून केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल फेज -2 मध्ये दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सामन्याला सुरुवात झाली. दिल्लीने प्रथम खेळताना 127/9 धावा केल्या.

    शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथने पहिल्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या. चांगल्या लयीत दिसणाऱ्या धवनची (24) विकेट लॉकी फर्गसच्या खात्यात आली. ऑरेंज कॅप बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा शिखरावर पोहोचली आहे. आतापर्यंत गब्बरने 454 धावा केल्या आहेत.