#Tokyo Paralympics 2020 बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरने पटकवले Gold Medal

अंतिम फेरीत कृष्णा नागरने हाँगकाँगच्या चू मान केई (Kai Man Chu) चा पराभव केला. कृष्णाने पहिला गेम २१-१७ असा जिंकला.

     

    टोकियो: जपानमध्ये सुरु असलेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये(Tokyo Paralympics ) शेवटच्या दिवशी भारताच्या बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने(KrishnaNagar) ‘सुर्वणपदक’  (Gold Medal) मिळवत गौरवास्पद कामगिरी केली आहे. भारताला मिळालेले हे ५ वे सुर्वण पदक आहे.

    अंतिम फेरीत कृष्णा नागरने हाँगकाँगच्या चू मान केई (Kai Man Chu) चा पराभव केला. कृष्णाने पहिला गेम २१-१७ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये केईने पुनरागमन केले आणि १६-२१ विजय मिळवला. दुसरीकडे, कृष्णाने तिसरा आणि निर्णायक गेम २१-१७ ने जिंकला.  त्याने हे पदक एसएच -६ (SH-6) प्रकारात जिंकले.

    कृष्णाची उंचीही वाढत नव्हती. कृष्णा २ वर्षांचा असावा, तेव्हाच कुटुंबाला त्याच्या आजाराची माहिती मिळाली. हळूहळू कृष्ण मोठा झाला. त्याने स्वतःला पूर्णपणे खेळासाठी समर्पित केले. तो दररोज घरापासून १३ किमी दूर स्टेडियममध्ये जाऊन प्रशिक्षण घेत असे.