‘या ‘ कारणामुळे मी आणि कुलदीप जास्त काळ एकत्र खेळू शकलो नाही – युजवेंद्र चहल

 चहलनं कुलदीपसोबत एकत्र का खेळत नसल्याचा खुलासा केला. आम्ही दोघं एकत्र खेळण्यापेक्षा संघातील संतुलन महत्त्वाचे आहे, असे चहलनं सांगितले.

    भारतीय संघातील ‘कुलचा’ या नावानं प्रसिद्ध असलेली कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही जोडी २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पुन्हा एकत्र खेळताना दिसलेली नाही. जून २०१९मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही दोघं टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अखेरचे दिसले होते. त्या सामन्यात चहलनं १० षटकांत ८८ धावा दिल्या, तर कुलदीपननं ७२ धावा देत १ विकेट घेतल्या.

    चहलनं कुलदीपसोबत एकत्र का खेळत नसल्याचा खुलासा केला. आम्ही दोघं एकत्र खेळण्यापेक्षा संघातील संतुलन महत्त्वाचे आहे, असे चहलनं सांगितले.

    रवींद्र जडेजा संघात परतल्यानंतर संघात ऑलराऊंडर फिरकीपटू परतला आणि त्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यात आमच्यापैकी एकाला जाणं भाग होतं, असेही चहलनं स्पष्ट केलं.