ला-लिगा फुटबॉलमध्ये व्हॅलेन्सियाचा ३-० असा पराभव

कोरोनामुळे ठप्प झालेली ला-लिगा फुटबॉलला पुन्हा सुरूवात झाली आहे. यामध्ये बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या दोन अव्वल संघांनी नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात केली आहे. बेन्झेमा आणि असेन्सियो यांच्या

 कोरोनामुळे ठप्प झालेली ला-लिगा फुटबॉलला पुन्हा सुरूवात झाली आहे. यामध्ये बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या दोन अव्वल संघांनी नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात केली आहे. बेन्झेमा आणि असेन्सियो यांच्या करिष्म्यामुळे रेयाल माद्रिदचा दमदार विजय झाला आहे. करिम बेन्झेमाचे दोन गोल आणि माकरे असेन्सियोचा पुनरागमनात एक गोल यामुळे रेयाल माद्रिदने ला-लिगा फुटबॉलमध्ये व्हॅलेन्सियाचा ३-० असा सहज पराभव केला. या विजयासह रेयाल माद्रिदने अव्वल स्थानावरील बार्सिलोनाविरुद्धची पिछाडी दोन गुणांचीच ठेवली. 

 बेन्झेमाने ६१व्या मिनिटाला इडेन हॅझार्डच्या पासवर गोल केला. असेन्सियाने ८६व्या मिनिटाला अप्रतिम पास देत बेन्झेमाला सामन्यातील दुसरा गोल करण्याची संधी दिली. याउलट व्हॅलेन्सियाची या पराभवामुळे आठव्या स्थानी घसरण झाली आहे. अन्य लढतींमध्ये रेयाल सोशायदादला अल्वेसकडून ०-२ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सोशायदादचे चौथे स्थान हुकले असून त्याला आता सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.