भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज टी-२० मालिकेचा शेवटचा सामना, हॅट्ट्रीक करण्यासाठी मोठी संधी?

वेगवान फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer)  उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि जोरदार फटकेबाजीमुळे कांगारूच्या हातात आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) १९५ धावांचं आवाहन भारताला (India) दिलं होतं. परंतु सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत या रोमहर्षक सामन्याचे चित्रचं बदलून टाकले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) यांच्यात टी-२० मालिकेचा (T-20 Series) शेवटचा सामना आज सिडनीत (Sydney) होणार आहे. तीन टी-२० मालिकेच्या सामन्यात भारतीय संघाने लगातर दोन वेळा घवघवीत यश प्राप्त केलं आहे. तसेच कांगारूचा दोन वेळा दारूण पराभव (Lost) केला आहे. परंतु आजचा सामन्यात भारतीय संघाला हॅट्ट्रीक (Hat-trick) करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे भारतीय संघ आज शेवटची (Last Series) मालिका खिशात घालणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ११ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर वेगवान फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer)  उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि जोरदार फटकेबाजीमुळे कांगारूच्या हातात आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने १९५ धावांचं आवाहन भारताला दिलं होतं. परंतु सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत या रोमहर्षक सामन्याचे चित्रचं बदलून टाकले.

टी-२० मालिकेत भारताने ‘अ’ संघावर आघाडी मिळवली आहे. तसेच विराट कोहलीच्या स्कूप शॉर्टची चर्चा सध्या रंगत आहे. तिसऱ्या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला तर हॅट्ट्रीक करण्याची संधी कोठेही गेलेली नाहीये. हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघ आज काय कमाल करणार आहे. याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.