IPL टीम Logo's Photo
IPL टीम Logo's Photo

इंग्लंडच्या खेळांडूच्या या निर्णयामुळे त्यांचे आयपीएल संघ नाराज झाले असून त्यांनी या वर्तनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे तक्रार केली आहे. इंग्लंडचे तीन खेळाडू डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स या तिघांनी उर्वरीत आयपीएलमधून माघार घेतली आहे. यातील जॉनी सनरायजर्स हैदराबाद, वोक्स दिल्ली कॅपिटल्स आणि मलान पंजाब किंग्सकडून खेळतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संघ व्यवस्थापन खेळाडूंनी अशा शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघा घेतल्यामुळे त्यांच्यावर नाराज असून त्यामुळेच बीसीसीआयला तक्रार करत पत्र लिहिले आहे.

  दिल्ली : कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या जगातिल सर्वांत धनाड्य लीग असलेल्या आयपीएल 2021 चे उर्वरीत सामने 19 सप्टेंबरपासून युएईत आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच इंग्लंडच्या तीन दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याचे आयपीएल फ्रॅन्चायझींना मोठा धक्का बसला आहे.

  इंग्लंडच्या खेळांडूच्या या निर्णयामुळे त्यांचे आयपीएल संघ नाराज झाले असून त्यांनी या वर्तनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे तक्रार केली आहे. इंग्लंडचे तीन खेळाडू डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स या तिघांनी उर्वरीत आयपीएलमधून माघार घेतली आहे. यातील जॉनी सनरायजर्स हैदराबाद, वोक्स दिल्ली कॅपिटल्स आणि मलान पंजाब किंग्सकडून खेळतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संघ व्यवस्थापन खेळाडूंनी अशा शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघा घेतल्यामुळे त्यांच्यावर नाराज असून त्यामुळेच बीसीसीआयला तक्रार करत पत्र लिहिले आहे.

  आणखी खेळाडूंची माघारीची शक्यता

  आयपीएल 2021 मध्ये भाग घेणारे इंग्लंडचे पाच खेळाडू माघार घेऊ शकतात असले बोलले जात आहे. मोईन अली, जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, ख्रिस वोक्स आणि सॅम करन हे या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. सध्या यापैकी तिघांनी (बेअरस्टो, वोक्स, मलान) माघार घेतली असल्याचे स्पष्ट आहे. मलान आणि बेअरस्टोने माघार घेतल्याने हैदराबाद आणि पंजाबला मोठा धक्का बसला आहे.

  विशेषत: हैदराबाद फ्रँचायझीसाठी मोठा धक्का आहे, कारण बेअरस्टोने गेल्या दोन हंगामात संघासाठी खूप चांगली कामगिरी केली होती. हैदराबादने अद्याप बदलीची घोषणा केलेली नाही. दरम्यान, पंजाब किंग्सने बटलरचा बदली खेळाडू म्हणून मार्करमचा संघात समावेश केला आहे. तर, सनरायझर्स हैदराबादने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शेरफेन रदरफोर्डला जॉनी बेअरस्टोच्या जागी संघात आणले आहे.

  ६ खेळाडूंचा न खेळण्याचा निर्णय

  आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याआधीच इंग्लंडच्या सहा खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. यात मलान, जॉनी आणि ख्रिसचा समावेस आहे. त्याआधी राजस्थान रॉयल्सचे फलंदाज जॉस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी आयपीएलमध्ये न खेळाण्याचा निर्णय घेतला आहे. जॉस बटलरच्या पत्नीने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे बटलरने स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्टोक्स त्याच्या मानसिक स्थितीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आर्चरच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो क्रिकेटपासून पूर्णपणे दूर असेल.