क्रिकेटच्या चाहत्यांसाठी जिओकडून ‘Dhan Dhana Dhan’ ऑफर, जाणून घ्या

जिओने ( Dhan Dhana Dhan ) ऑफरसह दोन नवीन प्लॅन बनविले आहेत. या प्लॅनची किंमत ४९९ आणि ७७७ रूपये इतकी आहे. आता पुढील सप्टेंबर महिन्यात आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन जिओ कंपनीने क्रिकेट प्रेमींसाठी हे दोन प्लॅन लॉंच केले आहेत.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio ) कपंनीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी धमाल ऑफर आणली आहे. यामध्ये कंपनीकडून प्रीपेड प्लान्स लॉंच करण्यात आले आहेत. जिओने ( Dhan Dhana Dhan ) ऑफरसह दोन नवीन प्लान बनविले आहेत. या प्लानची किंमत ४९९ आणि ७७७ रूपये इतकी आहे. आता पुढील सप्टेंबर महिन्यात आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन जिओ कंपनीने क्रिकेट प्रेमींसाठी हे दोन प्लान लॉंच केले आहेत. दरवर्षी आयपीएलचे आयोजन मार्च-एप्रिल महिन्यात केली जाते. परंतु यंदा कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकण्यात आले.

जिओच्या प्लानमध्ये एका वर्षासाठी डिज्नी आणि हॉटस्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री मिळतं. तसेच एका वर्षाची किंमत ३९९ रूपये इतकी आहे. मात्र या वेळचे आयपीएल सामने आपल्याला हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत.

जिओचा ४९९ रूपये प्लान –

जिओच्या ४९९ रूपयेच्या प्लानमध्ये ग्राहकांना व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. फक्त डेटासाठी नवनवीन प्लान आहेत. या प्लानमध्ये जिओ ग्राहकांना १.५ जीबी डेटा उपलब्ध होणार आहे. तसेच या प्लानची मुदत ५६ दिवसांसाठी आहे.

जिओचा ७७७ रूपये प्लान –

जिओच्या ग्राहकांना ७७७ रूपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची मुदत मिळते. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १.५ जीबी पेक्षा जास्त डेटा प्रतिदिन उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे एक वर्षासाठी डिज्नी आणि हॉटस्टार व्हीआयपीसाठी सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. जिओने काही दिवसांपूर्वीच ४०१ रूपयांचा नवीन प्लान लॉंच केला असून या प्लानमध्ये २८ दिवसांची मुदत मिळणार आहे.