बार्सिलोनाच्या विजयात लिओनेल मेस्सीची उत्कृष्ट खेळी

गेल्या मोसमात एकही जेतेपद न पटकावलेला बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय मेसीने घेतला होता. मात्र त्यानंतर बार्सिलोनासोबतच राहण्याचे मेस्सीने ठरवल्यानंतर या मोसमाच्या पूर्वतयारीच्या सामन्यात दोन गोल करून मेसीने झोकात पुनरागमन केले आहे.

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi)  गिरोनाविरूद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात बार्सिलोना ( Barcelona) संघाने ३-१ असा सामना जिंकला आहे. तसेच या बार्सिलोनाच्या विजयात मेस्सीने सर्वाधिक मोलाचा हातभार लावला असून त्याने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवले आहे.

गेल्या मोसमात एकही जेतेपद न पटकावलेला बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय मेसीने घेतला होता. मात्र त्यानंतर बार्सिलोनासोबतच राहण्याचे मेस्सीने ठरवल्यानंतर या मोसमाच्या पूर्वतयारीच्या सामन्यात दोन गोल करून मेसीने झोकात पुनरागमन केले आहे. फिलिपे कु टिन्होने २१व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयात योगदान दिले. गिरोनाकडून सॅम्युएल सेझने एकमेव गोल केला.