क्रिकेटचे लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचं आज ७२ व्या वर्षात पदार्पण, जाणून घ्या त्यांची कारकीर्द…

सुनील गावस्कर यांनी वेस्टइंडीजच्या विरूद्धात सर्वाधिक शतक झळकावले. टीम इंडियाला सर्वात उच्च स्थानावर त्यांनी पोहोचवलं होतं. त्यावेळी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंची उंची ५ फूट, ४ इंच इतकी होती. तरीसुद्धा लिटिल मास्टरांनी मायकल होल्डिंग, जोएल गार्नर यांसारख्या महान गोलंदाजांच्या विरूद्धात तुफान फलंदाजी करत २७ कसोटी सामन्यांमध्ये तब्बल १३ शतक झळकावले होते.

  नवी दिल्ली – वेस्ट इंडीजच्या विरूद्ध सर्वाधिक धावा करणारे भारताचे महान फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज (शनिवार) १० जुलै रोजी ७२ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांची फलंदाजी करण्याची शैली आणि टेक्नीक यांच्यामुळे त्यांना लिटिल मास्टर असं म्हटलं जात. ३४ वर्षापूर्वींची त्यांची कारकीर्द पाहिली असता, त्यांनी अनेक रेकॉर्ड आणि इतिहास घडवले आहेत. परंतु १९८७ च्या वर्ल्डकप नंतर सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतला.

  डेब्यू सीरीजमध्ये सर्वाधिक धावा 

  गावस्करांनी १९७१ मध्ये वेस्टइंडीजच्या विरूद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यांनी पोस्ट ऑफ स्पेन टेस्टमध्ये डेब्यू केला होता. या सामन्यात गावस्करांनी ६५ आणि ६७ धावांची शानदार खेळी केली होती आणि टीम इंडियाला ७ विकेट्सने जिंकवलं होतं. या मालिकेतील ५ कसोटी सामन्यांमध्ये गावस्करांनी १५४.८० आणि ७७४ इतक्या धावा केल्या होत्या. यामध्ये ४ शतक आणि ३ अर्धशतक सुद्धा केले होते.

  वेस्टइंडीजच्या विरूद्ध सर्वाधिक शतक

  सुनील गावस्कर यांनी वेस्टइंडीजच्या विरूद्धात सर्वाधिक शतक झळकावले. टीम इंडियाला सर्वात उच्च स्थानावर त्यांनी पोहोचवलं होतं. त्यावेळी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंची उंची ५ फूट, ४ इंच इतकी होती. तरीसुद्धा लिटिल मास्टरांनी मायकल होल्डिंग, जोएल गार्नर यांसारख्या महान गोलंदाजांच्या विरूद्धात तुफान फलंदाजी करत २७ कसोटी सामन्यांमध्ये तब्बल १३ शतक झळकावले होते.

   विरूद्ध कसोटी  वनडे  शतके
  वेस्टइंडीज २७ २७४९ १३
  इंग्लंड ३८ २३८३
  पाकिस्तान २४ २०८९
  ऑस्ट्रेलिया २० १५५०
  श्रीलंका ६००