लिव्हरपूलकडून आर्सेनलचा धुव्वा, केली ३-१ अशी मात

इंग्लिश प्रीमियर लीग (English Premier League) मोसमाची गतविजेत्या लिव्हरपूलने (Liverpool ) धडाक्यात सुरूवात केली असता, लिव्हरपूलने सलग तिसऱ्यांदा (Third time win)  विजयाची नोंद केली आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग (English Premier League) मोसमाची गतविजेत्या लिव्हरपूलने (Liverpool ) धडाक्यात सुरूवात केली असता, लिव्हरपूलने सलग तिसऱ्यांदा (Third time win)  विजयाची नोंद केली आहे. पिछाडीवर पडल्यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करत आर्सेनलचे (Arsenal ) आव्हान ३-१ असे मोडीत काढले.

२५व्या मिनिटाला अलेक्झांड्रे लाकाझेट्टेने आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर तीन मिनिटांनी सादियो माने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली. परंतु सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना दिओगो जोटा याने तिसरा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये करण्यात आलेल्या कोरोना चाचणीनंतर १० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवडय़ात १,५९५ खेळाडू तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोनाबाधितांची नावे उघड करण्यास इंग्लिश प्रीमियर लीगने नकार दिला आहे. तसेच सेरी-ए फुटबॉल स्पर्धेतील जिनोआ क्लबच्या १२ जणांना कोरोना झाला आहे. त्यामुळे क्लबच्या कोरोनाग्रस्तांची संख्या १४ झाली आहे.