लॉकडाऊनमुळे बेंगळुरूच्या साई केंद्रात अडकलेल्या भारतीय हॉकीपटूंना घरी परतण्याची मुभा

नवी दिल्ली :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय हॉकी खेळाडू हे बेंगळूरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ( साई) केंद्रात अडकले होते. परंतु तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर अखेर त्यांना एका

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय हॉकी खेळाडू हे बेंगळूरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ( साई) केंद्रात अडकले होते. परंतु तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर अखेर त्यांना एका महिन्यासाठी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच भारताच्या हॉकी इंडियाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. 

हॉकी खेळाडूंना सध्या विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे थोडे दिवस त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवता यावेत, त्यामुळे महिनाभर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले की, खेळाडूंना घरी पाठवण्यात आले असले तरी त्यांना सरकारच्या आदेशाप्रमाणे गर्दीमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. खेळाडूंना जास्त काळ घरी थांबण्याचेच आदेश देण्यात आले आहेत.