आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून महेंद्रसिंह धोनी निवृत्त

धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असायची; परंतु शनिवारी धोनीने या निवृत्तीच्या चर्चाना अखेर पूर्णविराम दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी इंडियन प्रीमियर लीग खेळत राहणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले. त्यानंतर इन्स्टाग्रामवर धोनीने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एका मिनिटातच सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असायची; परंतु शनिवारी धोनीने या निवृत्तीच्या चर्चाना अखेर पूर्णविराम दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी इंडियन प्रीमियर लीग खेळत राहणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले. त्यानंतर इन्स्टाग्रामवर धोनीने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एका मिनिटातच सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली आहे. 

फलंदाजी करूनही धोनी पूर्णवेळ यष्टीरक्षकाच्या भूमिकेत उभा असायचा आणि ही त्याच्या स्टॅमीनाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तसेच भारताचा आजी कर्णधार विराट कोहली संघात येताच धोनीच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले. धोनी हे सचिन तेंडुलकरनंतरचं पुढचं पाऊल होतं. धोनीने कर्णधारपदी येताच मैदानावर अपयशी ठरलेल्या ज्येष्ठांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. धोनी फक्त मास्टरब्लास्टर सचिन तेडुलकर यांना संघाबाहेर काढू शकला नाही.

धोनीच्या मधल्या फळीतल्या भरवश्याच्या खेळीने भारताला अनेक सामने जिंकून दिले. २०११चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा फार मोठा वाटा आहे. धोनीच्या जीवनावर आधारीत बनलेल्या सिनेमात दिवंगत सुशांतने हुबेहूब धोनी डोळ्यांसमोर उभा केला.  गेले सहा महिने धोनी क्रिकेटपासून पूर्णत: दूर आहे. त्यामुळे तो आता समालोचक किंवा क्रिकेट प्रशिक्षकेच्या भूमिकेत असू शकेल.