‘७ क्रमांका’ची महेंद्रसिंग धोनीला मिळाली उत्तम साथ, नक्की काय आहे कनेक्शन?

जगातील प्रसिद्ध ‘कॅप्टन कूल’ हे विशेषण असलेला महेंद्रसिंग धोनी ‘७ क्रमांकाला ‘ भाग्यवान समजतो. कारण धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला होता. तसेच त्याची जन्मतारीख ७ आणि महिनादेखील ७ वा आहे. त्यामुळे धोनीचा न्यूमेरोलॉजीवर खूप विश्वास असल्याचे एका मुलाखतीत त्याने सांगितले होते.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयात धोनीने अनेक महत्त्वाचे योगदान दिले आहेत. परंतु धोनीच्या जर्सीवर ‘७’ असा क्रमांक आहे. त्यामुळे या क्रमांकाशी त्याचं काहीतरी संबंध असल्याचे म्हटले जाते. जगातील प्रसिद्ध ‘कॅप्टन कूल’ हे विशेषण असलेला  महेंद्रसिंग धोनी ‘७ क्रमांकाला ‘ भाग्यवान समजतो. कारण धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला होता. तसेच त्याची जन्मतारीख ७ आणि महिनादेखील ७ वा आहे. त्यामुळे धोनीचा  न्यूमेरोलॉजीवर खूप विश्वास असल्याचे एका मुलाखतीत त्याने सांगितले होते.

धोनीने एक मोठ्या स्मार्टफोन कंपनीसोबत करार केला होता. मात्र या कंपनीसोबत त्याने ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता आणि ७ वर्षांसाठी करार केला होता. त्यामुळे ७ वर्षांसाठी कोणत्याही कंपनीसोबत करार करणे ही एक मोठी गोष्ट आहे. कारण त्याआधी कुठल्याही खेळाडूने कोणत्याही कंपनीशी इतक्या वर्षांसाठी करार केला नव्हता. परंतु कोणीही जे करू शकत नाही ते धोनी करून दाखवतो. हेच माहीचे वैशिष्ट्य आहे. 

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनीचा साथीदार आणि वेगवान फलंदाज सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दोघांच्या निवृत्तीने सर्वांना धक्का बसला. परंतु सध्या हे दोघेही आयपीएलसाठी तयारी करत आहेत. येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.