मँचेस्टर सिटीचा बर्नले संघावर दणदणीत विजय

या आठवड्यातील सोमवारी रात्री मँचेस्टर सिटी आणि बर्नले या दोन संघाचा सामना खेळण्यात आला. त्यामुळे मँचेस्टर सिटी या संघाने बर्नले या संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिल

या आठवड्यातील सोमवारी रात्री मँचेस्टर सिटी आणि बर्नले या दोन संघाचा सामना खेळण्यात आला. त्यामुळे मँचेस्टर सिटी या संघाने बर्नले या संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिल फोडेन आणि रियाद महरेझ यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे, मँचेस्टर सिटीने मोठा विजय मिळवला आहे. तसेच ५१ व्या मिनिटाला डेव्हिड सिल्वाने गोल करीत विजयात आपले मह्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

तसेच मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात सर्जियो अॅनग्युरोच्या पायाच्या दुखापतीने तो त्रस्त होता अॅ्ग्युरोची दुखापत गंभीर वाटत असली तरी गुरुवारी आम्ही त्याचा आढावा घेणार आहोत. उजव्या पायाच्या घोटय़ावर तो आदळला होता. दरम्यान, युव्हेंटसने बोलोग्नावर २-० असा विजय मिळवला होता. सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाच्या दिशेने कूच केली. कोरोनाची बाधा झाल्याच्या ५० दिवसांनंतरही पावलो डायबला याने युव्हेंटससाठी गोल झळकावला होता.