मनीष नरवालने साधला ‘सुवर्ण’ वेध तर सिंहराज अधानाने जिंकले ‘रौप्य पदक’

नेमबाजीमध्ये मनीष नरवालने(Manish Narwal) 'सुवर्ण' (Gold Medal) तर सिंहराज अधाना (Singhraj adhana)याने एसएच -१ श्रेणी ५० मीटर एअर पिस्तूलमध्ये 'रौप्य पदक'(Silver Medal) जिंकले आहे.

    टोकियो: पॅरालिम्पिकमध्ये ११ व्या दिवसाची सुरुवात सर्वोत्तम झाली असून नेमबाजीमध्ये मनीष नरवालने(Manish Narwal) ‘सुवर्ण’ (Gold Medal) तर सिंहराज अधाना (Singhraj adhana)याने एसएच -१ श्रेणी ५० मीटर एअर पिस्तूलमध्ये ‘रौप्य पदक'(Silver Medal) जिंकले आहे. बॅडमिंटनमध्ये, एसएल-४ मध्ये, नोएडाचा डीएम सुहास यतीराज यांनीही अंतिम फेरी गाठून भारताचे दुसरे पदक निश्चित केले. याआधी प्रमोद भगतने एसएल-3 मध्ये भारतासाठी किमान रौप्य पदक पक्के केले आहे.

    मनीषने अंतिम फेरीत २०९ स्कोर केला, तर सिंगराजने २०७ गुणांसह रौप्य पदक जिंकले. यापूर्वी, अधाना ५३६ गुणांसह पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर होता , तर नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. अधानाने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

    याआधी शुक्रवारी भारताला 3 पदके मिळाली होती. हरविंदर सिंगने तिरंदाजीत भारतासाठी तिसरे पदक जिंकले. त्याने कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन धनुर्धाराचा शूट ऑफमध्ये पराभव केला. त्याच्या आधी राजस्थानच्या अवनी लेखारा हिने ५० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले. अवनीशिवाय प्रवीण कुमारनेही देशासाठी पदक पटकावले. त्याने उंच उडीत रौप्य पदक जिंकून नवीन आशियाई विक्रम केला. त्याला हे पदक टी -६४ श्रेणीच्या उंच उडीत मिळाले.

    भारताकडे पॅरालिम्पिकमधील १४ पदके
    भारताची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १४ पदके आहेत. आतापर्यंत ५३ वर्षात ११ पॅरालिम्पिकमध्ये १२ पदके आली आहेत. पॅरालिम्पिक १९६० पासून होत आहे. भारत १९६८पासून पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. भारताने १९७६आणि १९८०मध्ये भाग घेतला नाही.