mariyappan-thangavelu

भारतीय खेळाडू मरिअप्पन थंगवेलूने(Mariyappan Thangavelu) उंच उडीत देशासाठी रौप्यपदक (Silver medal To Mariyappan Thangavelu) पटकावले. 

    टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics ) भारतीय खेळाडू मरिअप्पन थंगवेलूने(Mariyappan Thangavelu) उंच उडीत देशासाठी रौप्यपदक (Silver medal To Mariyappan Thangavelu) पटकावले. मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले. याच प्रकारात शरद कुमारने(Sharad Kumar) तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.


    तामिळनाडूच्या मरिअप्पनने गेल्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या टी-४२ उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सर्व देशवासीयांची मने जिंकली होती. यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्येही रूपेरी कामगिरी करत मरिअप्पनने सलग पॅरालिम्पिक पदक पटकावण्याचा विक्रम केला आहे.


    जपानची राजधानी टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ दाखवून पदकतालिकेत दुहेरी अंक गाठला आहे. मरिअप्पन आणि शरद यांच्या पदकांमुळे भारताने उंच आपली पदकतालिका १० अशी केली आहे.