Mary Kom will lead India; Asian Boxing Championships

सहा वेळा जागतिक जेतेपद प्राप्त करणारी मेरीकोम पुढील महिन्यात इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होत असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. ही माहिती भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    दिल्ली : सहा वेळा जागतिक जेतेपद प्राप्त करणारी मेरीकोम पुढील महिन्यात इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होत असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. ही माहिती भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    बीएफआयने गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता फेरी आयोजित केली होती. तथापि या स्पर्धेत मेरी कोम, सिमरनजीत कौर, लोवलिना बोरगोहैन आणि पूजा राणीने भाग घेतला नव्हता.

    या स्पर्धेत हरयाणाची मोनिका 48 किलोगॅम वजन गटात तर साक्षी 54 किलो वजनगटात प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणार आहेत. याशिवाय जास्मीन (57 किलोग्रॅम), पाविलाओ बासुमातारी (64 किलोग्रॅम), स्विटा बोरा (81किलोग्रॅम), आणि अनुपमाचाही (81+ किलोग्रॅम) समावेश करण्यात आला आहे.