एमसी मेरी कोम हिला रेनो इंडियाच्या वतीने सर्वार्थाने नवीन स्पोर्टी, स्मार्ट आणि देखणी रेनॉल्ट कायगर भेट

एमसी मेरी कॉम ही शिनी विल्सन आणि अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक होणारी तिसरी महिला ॲथलीट आहे. अनुभवी बॉक्सर मेरी कॉमने बॉक्सिंग रिंगच्या आत आणि बाहेर नेहमीच राष्ट्राला अभिमान दिला आहे.

    मुंबई : वुमन बॉक्सर आणि #टोकियोऑलिम्पिक 2020 ध्वजवाहक एमसी मेरी कोम हिचा रेनॉल्ट इंडिया तर्फे सन्मान करण्यात आला.एमसी मेरी कोम हिला रेनो इंडियाच्या वतीने सर्वार्थाने नवीन स्पोर्टी, स्मार्ट आणि देखणी रेनॉल्ट कायगर भेट देण्यात आली आहे.

    एमसी मेरी कोम ही शिनी विल्सन आणि अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक होणारी तिसरी महिला ॲथलीट आहे. अनुभवी बॉक्सर मेरी कोमने बॉक्सिंग रिंगच्या आत आणि बाहेर नेहमीच राष्ट्राला अभिमान दिला आहे.

    वेंकटराम ममिल्लापल्ले,कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर, रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सने नवीन रेनॉल्ट कायगरची चावी एम सी मेरी कोमला सुपूर्द केली आणि राष्ट्रासाठी प्रेरणा बनल्याबद्दल तिचे अभिनंदन केले.