पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत; टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले

दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक यांनी प्रत्येकी एक गोल करत भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत 8 सुवर्णपदकं आहेत. शेवटचं पदक 1980 मध्ये भारताने मिळवलं होतं. त्यावेळी उपांत्य फेरी नव्हती.

    टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पुरुषांच्या भारतीय हॉकी टीमने (Hockey Team India mens) इतिहास घडवला आहे. जवळपास 49 वर्षांनी भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय हॉकी संघाने ब्रिटनच्या संघावर 3-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत आगेकूच केली. 1972 नंतर पहिल्यांदाच भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

    दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक यांनी प्रत्येकी एक गोल करत भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत 8 सुवर्णपदकं आहेत. शेवटचं पदक 1980 मध्ये भारताने मिळवलं होतं. त्यावेळी उपांत्य फेरी नव्हती.

    1980च्या पदकानंतर भारतीय हॉकीची घसरण झाली. तो काळ जागवण्याची संधी भारतीय पुरुष संघाकडे आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाचा मुकाबला बेल्जियमशी होणार आहे.