युएईमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये मुंबईकडून चेन्नईचा दारूण पराभव, वचपा काढण्यासाठी धोनी तयार

पहिल्या टप्प्यानंतर चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं युएईमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव केला होता. महेंद्रसिंह धोनीच्या टीमसाठी (MS Dhoni) मागील सिझन खराब गेला होता.

    दुबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात यूएईमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात मुंबईकडून चेन्नईचा दारूण पराभव करण्यात आला होता. आज मुंबई आणि चेन्नई असे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन यशस्वी टीमच्या लढतीनं या स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) सुरू होणार आहे.

    पहिल्या टप्प्यानंतर चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं युएईमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव केला होता. महेंद्रसिंह धोनीच्या टीमसाठी (MS Dhoni) मागील सिझन खराब गेला होता. त्यामुळे धोनीचं यंदा चांगल्या फॉर्ममध्ये कमबॅक झालं असून मुंबईला हरवण्यासाठी त्याची टीम तयार आहे.

    स्पिनर्सच्या बाबतीत चेन्नईची टीम मुंबईवर वरचढ आहे. चेन्नईकडं रविंद्र जडेजा आणि इम्रान ताहीर हे दोन अनुभवी स्पिनर्स आहेत. तर मुंबईकडं राहुल चहर आहे.